¡Sorpréndeme!

सचिन वाझेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसबाबत गृहमंत्री म्हणाले, मी संपूर्ण माहिती घेतोय…

2021-06-12 0 Dailymotion

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी त्यांच्याशी वरिष्ठांनी संपर्क केला आहे. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारणा केली असता, ‘मी आत्ताच मुंबईहून नागपुरामध्ये पोहोचलो, संपूर्ण माहिती घेतोय.’, येवढेच उत्तर त्यांनी दिले. या विषयावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​