¡Sorpréndeme!

एकमेकांवर अंड्यांचा भडिमार, वाढदिवसाचा असा जल्लोष करन पडला महागात..

2021-06-12 0 Dailymotion

जुन्नर : आज काल वाढदिवस साजरा करणे म्हणजे एक नवीनच ट्रेंड निर्माण झालाय . तरुण मंडळी कधी तलवारीने केक कापताना दिसतात तर कधी लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास वाढदिवस साजरे करतात , त्यातच काही बहाद्दर तर तोंडावर अंगावर केक फेकून वाढदिवस साजरा करता हे सगळ आपण बघितलं देखील असेल मात्र जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे काही युवकांनी मंदिरासमोर एकमेकांवर अंडी फेकून मारत वाढदिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ काही युवकांनी सोशल मीडिया वर वायरल केलाय. त्यानंतर पोलिसांनी थेट बर्थडे बॉय सोबत सहा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सकलेन नासिर आतार, साकिर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन एकलाक आतार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहीद पिर महम्मद पटेल या सहा जणांवर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्यांचा शोध घेताय...