¡Sorpréndeme!

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

2021-06-12 0 Dailymotion

गाडीला पाठीमागून धक्का दिल्याने निर्माण झालेल्या वादातून अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एकाला मारहाण केल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. कैलास सातपुते यांनी यवत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.