जालना : ''एकनाथ खडसे हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीने त्यांचा उपयोग त्यासाठी करुन घ्यायला हवा. मात्र, केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांसाठी त्यांचा उपयोग केला गेला, तर त्यासारखे दुर्दैव नाही,'' असे प्रतिपादन भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे केले.