जालना : कोरोनाची चाचणी घेण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या किट्स बनावट असल्याची तक्रार भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यावर लोणीकर यांना आरोप करण्याशिवाय दुसरा धंदा राहिलेला नाही, असा पलटवार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.