शिक्षक आणि पदवीधर निवडणूक केंद्रात विना परवाना प्रवेश केल्या प्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार जयसिध्देश्वर महास्वामी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
विनापरवाना पंढरपूर येथील एका मतदान केंद्रात प्रवेश केला म्हणून त्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे यांनी केली आहे.