सोलापुरातील बार्शीमध्ये पुराच्या पाण्यात नुकसान झालेल्या रहिवाश्यांनी भाजपचे राजेंद्र मिरगणे आणि शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोठा मोर्चा काढला, मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसात सोलापुरातील बार्शीतील रहिवाश्यांच्या घरात पाणी जाऊन मोठं नुकसान झालं होते. मात्र या नुकसानीचे अद्याप पंचनामे देखील झाले नाहीत, तसेच बार्शीत नगरपालिकेने प्रमाणापेक्षा जास्त रस्त्यांची उंची वाढवून नियम धाब्यावर बसवले आणि त्यामुळेच लोकांच्या घरात पाणी घुसल्याचा आरोप भाजपचेच राजेंद्र मिरगणे यांनी केला आहे आणि या मोर्चात भाजपला उघड उघड समर्थन शिवसेनेच्या नेत्याने दिल्याने जिल्ह्याभरातील लोकांच्या भुवया उंचालवल्या आहेत, विशेष म्हणजे भाजप च्या विरोधात भाजपचेच हे आंदोलन झाले आहे. या मोर्चात पोतराज आणि हांडे,घागरी घेऊन हजारोंच्या संख्येने महिला आणि इतर नागरिक उपस्थित होते.