बेळगाव : बेळगावसह सीमाभागात पाळल्या जाणाऱ्या काळ्या दिनाला पाठिंबा म्हणून १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे सर्व कॅबिनेट व राज्यमंत्री दंडाला काळी फित बांधून कामकाज पाहणार आहेत. गुरुवारी (ता. २९) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून महाराष्ट्रातही निषेध व्हावा, अशी विनंती केली होती.