नारायण राणेंनी २०१९ ची निवडणूक लढायला हवी होती; पण पुन्हा एकदा पराभव नको म्हणून त्यांनी त्यावेळच्या निवडणुकीतून पळ काढला होता. आता आमचे तुम्हाला आव्हान आहे की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला तुम्ही कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढवून दाखवा. त्यावेळी तुम्हाला कळेल की शिवसेनेचे ११ नव्हे तर २१ आमदार निवडून आलेले असतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागेल,'' असा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे यांना उद्देशून दिला आहे.
भाजपच्या विस्तृत जिल्हा कार्यकारणी मध्ये नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला खाली खेचणार आणि सिंधुदुर्गातून शिवसेना हद्दपार करणार असा निर्धार कार्यकारणी मध्ये राणे यांनी केला होता. त्यालाच प्रत्युत्तर देताना खासदार विनायक राऊत म्हणाले... नारायण राणे यांनाच दहा वर्षापूर्वीचं कोकणी जनतेने हद्दपार केलेले आहेत ज्यांनी शिवसेना हद्दपार करणे शब्दच काढू नये. संपूर्ण भारताच्या लोकशाहीमध्ये नारायण राणे यांचा स्वाभिमान नावाचा एकमेव पक्ष होता. त्याला जन्मला घातल्यानंतर वाढदिवस साजरा करण्याआधी विसर्जित करावा लागलाय. ज्यांना स्वतःचा पक्ष ठिकवता आला नाही त्या नारायण राणे यांनी शिवसेनेला विसर्जित करण्याचं स्वप्न पाहणे म्हणजे बेडकाने बेलाशी स्पर्धा करण्यासारखं आहे. असे विनायक राऊत म्हणाले.