¡Sorpréndeme!

मराठ्यांनी कुणाचा रेडा मारला हे कळत नाही : नरेंद्र पाटील यांची खंत

2021-06-12 0 Dailymotion

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद मांडण्यात आपण कमी पडल्यानं मराठा समाज नाराज झालाय.आमच्या मराठ्यांनी कुणाचा रेडा मारला ते कळत नाही. आमच्या मराठ्यांच्या विरोधात सगळेच असतात. सगळ्यात जास्त मराठे राज्यकर्त्यांमध्ये असूनही मराठा समाजाला कुणी वाली राहिला नाही.आम्ही राजकीय नेत्यांचे झेंडेच घेऊन फिरायचं का असा सवाल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे. आज जालन्यात मराठा जागर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.