कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन एकीकडे प्रशासनाकडून केले जात असताना डी मार्टमध्ये मात्र याची कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे शहराचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी केलेल्या पाहणीत लक्षात आले. श्री. जाधव यांनी स्वतः खरेदीसाठी आलेल्या लोकांना सुरक्षित अंतरावर राहण्यास सांगितले तर व्यवस्थापनाला 'सोशल डिस्टन्सिंग'साठी पट्टे मारण्याचे आदेश दिले, पण दुसऱ्या दिवशीही हे पट्टे न दिसल्याने श्री. जाधव चांगलेच संतापले, याबाबत चुकीची माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्याला त्यांनी 'कानाखाली आवाज काढीन' असा दमच भरला.