रंगीबेरंगी चौकोनी कागद घेऊन तो कुठेही न कापता त्याच्या घड्या घालायच्या आणि त्यापासून आपल्याला हवे ते प्राणी, पक्षी, मासे, फुले असे आकार घडवायचे. ओरिगामी या नावाने ओळखली जाणारी ही घडीबाजीची कला शिकणे किती सहजशक्य आहे हे प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्याचा आनंद बालदोस्तांनी ओरिगामीच्या खास सत्रातून घेतला. ‘लोकसत्ता’च्या ‘मधली सुट्टी’ या उपक्रमात श्रीराम पत्की यांनी ओरिगामीचे गंमतीशीर विश्व वेब गप्पांमधून मुलांसमोर उभे केले.
#लोकसत्ता #मधलीसुट्टी #Kids #Parents #Origami