¡Sorpréndeme!

पाण्यातील मृतदेहांमधून करोनाचा प्रसार होतो का?

2021-05-30 2,044 Dailymotion

एकीकडे करोनाचं संकट असताना उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी गंगा नदीच्या पाण्यात मृतदेह तरंगतानाचे फोटो सोशल मिडिया वर व्हायरल झाले. गंगेच्या पात्रातील मृतदेहांनी अनेकांची चिंता वाढवली आहे. यानिमित्ताने दोन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. पहिला म्हणजे, मृतदेहांमधून करोनाचा प्रसार होतो का? आणि दुसरा म्हणजे नदीमधून करोनाचा प्रसार होणं कितपत शक्य आहे?

#gangariver #covid19 #coronavirus