¡Sorpréndeme!

केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निर्णयाविरोधात राज्यमंत्री बच्चू कडू आक्रमक

2021-05-19 386 Dailymotion

लॉकडाऊन मूळे शेतकरी अडचणीत असतानाच आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहिलं आहे. केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू आता आक्रमक झाले असून येत्या २० तारखेला ते "टाळी बजाव-थाळी बजाव" आंदोलन करणार आहेत. २० मे रोजी संध्याकाळी सहा वाजता आपल्या घरीच प्रत्येक शेतकऱ्याने हे आंदोलन करण्याचे आवाहनही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

#BachchuKadu #Farmers #Maharashtra #Lockdown