पद्मश्री पुरस्कार विजेते आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष के के अग्रवाल यांचं सोमवारी करोनामुळे निधन झालं. नवी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून ते करोनाशी लढा देत होते. करोना झाल्यानंतरही शेवटच्या क्षणांमध्ये ते रुग्णसेवेसाठी झटत होते. त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#Covid19India #KKAggarwal #DrKKAggarwal