¡Sorpréndeme!

पंतप्रधानांनी कौतुक केल्याने फडणवीस, चंद्रकांत दादांच्या आरोपात कमतरता येईल- जयंत पाटील

2021-05-09 2,817 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना कळलं असेल राज्यात कशा पद्धतीने काम सुरु आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतंय. मुंबईची स्थितीही सुधारली आहे. नुसता विरोधाला विरोध करणं चुकीचं आहे. मोदींनी केलेल्या कौतुकामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या आरोपात कमतरता येईल अशी आशा आहे, असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.