गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. यासाठी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी आणि विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून मतदानावेळी शक्ती प्रदर्शन करण्यात आले. सत्तारूढ गटाचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक आणि विरोधी गटाचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत मतदारांना केंद्रापर्यंत आणले. मतदारांना यावेळी विशिष्ट रंगाची टोपी, मफलर घालून मतदान केंद्रात आणले जात आहे. यावेळी गेली ३० वर्षे सत्ता भूषविणारे विद्यमान सत्ताधारी सत्ता अबाधित राखणार की सत्ता परिवर्तन होणार यांचीच सर्वत्र उत्सुकता आहे.