महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार रमेश वांजळे यांना आज (शनिवार) वैकुंठ स्मशानभूमीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासहित विविध क्षेत्रांमधील मान्यवर तसेच हजारो कार्यकर्त्यांनी वांजळे यांचे अखेरचे दर्शन घेतले. वांजळे हे पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे आमदार होते.