¡Sorpréndeme!

याना बनली लैला...

2021-04-28 1 Dailymotion

'आयटम नंबर'चा चसका संपूर्ण चित्रपटसृष्टीला लागलाय. सध्या फारसं काम नसलेल्या काही अभिनेत्रीही अगदी चातकाप्रमाणे एखाद्या नवीन चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट पाहत "आयटम नंबर'च्या विळख्यात येऊ लागल्या आहेत. आता याना गुप्ताच पाहा ना... कोण याना असा प्रश्‍न विचारू नका... अहो ती "बाबूजी जरा धीरे चलो...' या "आयटम नंबर'मधून आलेली.... नंतर मात्र कुठे दिसेनाशीच झाली... "बाबूजी...'नंतर दोनेक चित्रपट हाताशी पटकवता येतील, या भोळ्या विचारात ती पार बुडूनच गेली होती... म्हणून ती कुठे फारशी दिसून आली नाही. असो... आता याना लवकरच येणार आहे... तेही झीनत अमान यांचं लोकप्रिय आयटम सॉंग "लैला ओ लैला' घेऊन... झीनत अमान यांच्या "दम मारो दम' या गाण्याचे रिमिक्‍स व्हर्जन घेऊन आलेल्या दीपिका आणि "दम मारो दम'च्या संपूर्ण टीमवर झीनत चांगल्याच नाराज आहेत.