संप सुरुच; आमचे उग्र रुप पाहू नका : सुरेश धस
---
बीड : आपण भाजप आमदार व गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटना, श्रमिक कामगार संघटना तसेच इतर सर्व ११ संघटनांनी ऊसतोड मजूरांच्या मजूरीत दिडशे टक्के दरवाढीची मागणी केलेली असल्याचे सुरेश धस म्हणाले. या मागणीसाठी संप सुरुच असून मंगळवारी पुणे येथे साखर संघ व संघटनांची बैठक होईपर्यंत कोणीही कारखान्यावर जाऊ नये असे आवाहन केले. जर कोणी नेण्याची हिंमत केलीच तर आमचे उग्र रुप कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
#beed #sugar #cane #bjp #MLA #Suresh #dhas