#बीड : पावसांने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देऊन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहील असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. नुकसानीचे पंचने करताना अंतरपिकांची नोंद घेतली जाईल, कृषी विभागाने केलेले पंचनामे पीक विमा देण्यासाठी ग्राह्य धरावीत यासाठी सरकार प्रयत्न करेल असेही मुंडे म्हणाले. त्यांनी रविवारी गेवराई तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. (व्हिडिओ : कृष्णा शिंदे)
#beed #farmers #dhananjay #munde #crop #gavrai