मायक्रो फायनान्सचे महिलांचे कर्ज माफ झालेच पाहिजे, या मागणीसाठी छत्रपती शासन महिला संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत महिलांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मारला. एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता, आम्ही मागतो हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, फायनान्स कर्ज माफी झालीच पाहिजे, या घोषणांनी मोर्चात रंगत आणली असली तरी कोरोनाच्या संकटात एकवटलेल्या महिलांना शासकीय नियमांची आठवण करुन देताना पोलिस यंत्रणेची डोकेदुखी वाढली.
रिपोर्टर : संदीप खांडेकर
व्हिडिओ : बी. डी. चेचर