सातारा : वैद्यकीय प्रवेशाची नीट परीक्षा आज (रविवार) दुपारपासून होत आहे. सातारा शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल या परीक्षेसाठी जिल्ह्याचे समन्वयक आहे. प्रवेशद्वारावरच प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग केले जात हाेते. परीक्षा कक्षामध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली हाेती. कोरोनाचा धोका लक्षात घेता परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्याची माहिती प्राचार्य ए. के. सिंग यांनी दिली.