'पुढच्या वर्षी लवकर या, सारी विघ्ने दूर करून या' 'निरोप देतो देवा आता आज्ञा असावी, कोरोना मुळे काही चुकले असेल तर क्षमा असावी' अशी साद घालत गुरुवारी घरगुती बाप्पा आणि गौराईला कोल्हापूरकरांनी पर्यावरण पूरक निरोप दिला. शहरातील तालीम संस्था तरुण मंडळांनी यंदा आपापल्या परिसरात काहिली ठेऊन पर्यावरण पूरक विसर्जनाचा उपक्रम राबवला. पंचगंगा नदी घाट आणि शहरातील विविध तलावाच्या ठिकाणी शांतता राहिली.
बातमीदार : संभाजी गंडमाळे
व्हिडीओ : मोहन मेस्त्री