¡Sorpréndeme!

खासदार नवनीत राणा म्हणाल्या खूप वेदना झाल्या पण मी मरता मरता वाचली, कारण...

2021-04-28 1 Dailymotion

अमरावती :   अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रथम अमरावती, नंतर नागपूर आणि त्यानंतर मुंबईला हालविण्यात आले होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आज त्यांना आयसीयुमधून सामान्य कक्षात हालविण्यात आले. ‘मरता मरता वाचले, कारण माझ्यासोबत जनतेचे आशीर्वाद आणि प्रार्थना होत्या’, अशी प्रतिक्रिया त्यांनी आज दिली.