¡Sorpréndeme!

BelgumNews । बेळगावात संतप्त जमावाकडून रुग्णालयावर तुफान दगडफेक, रुग्णवाहिकाही पेटवली...

2021-04-28 3,848 Dailymotion

बेळगाव - सिव्हिलमधील कोरोना विभागात उपचारादरम्यान बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने जिल्हा रुग्णालयाबाहेरील रुग्णवाहिका पेटवून धुडगूस घातला. यावेळी बिम्ससमोरील सहा खासगी वाहनांवर तुफान दगडफेक करून तोडफोड केली. इतकेच नव्हे, तर कोरोना विभागातील  डॉक्‍टर, परिचारिका आणि वॉर्डबॉयनाही मारहाण करण्यात आली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहरासह आरोग्य विभागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्त  डॉ. के. त्यागराजन व जिल्हाधिकारी हिरेमठ व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.