अकोला, ता. 22 ः कायम दुष्काळी गाव असलेल्या मासा-सिसा उदेगावला पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत खोदण्यात आलेली विहिर बुजवण्याचा आदेश देणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तुघलकी कारभाराचा पाढा गावकरी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.22) पालकमंत्री बच्चू कडू यांच्यापुढे वाचला.
जिल्ह्यातील राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीमुळे एकीकडे एक न्याय व दुसरीकडे दुसऱ्या न्यायाने कारभार केला जात आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत मासा-सिसा उदेगावला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिर खोदण्यात आल्यानंतर ती विहिर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या 200 मीटर क्षेत्राच्या आत असल्याचे सांगून लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी सरपंच्यावर गुन्हे दाखल केले. कार्यकारी अभियंता वाकोडे यांच्या आदेशाने विहिर बुजवल्यास शासनाचे 55 लाख पाण्यात जाणार असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे.