¡Sorpréndeme!

गृहमंत्री देशमुख यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

2021-04-28 1,793 Dailymotion

सोलापूर : दलित युवा पॅंथरचे अतिश बनसोडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही त्यांनी राज्यातील राज्यातील दलितांवरील अन्यायाविरुद्ध पोलीस काहीच कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ ताफा अडवून निवेदने धीर भिरकावण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यामध्ये दलितांवरील अन्याय विरुद्ध सरकारवर टीका केली होती. हा धागा पकडत बनसोडे या तरुणाने यावेळी हातात निवेदन घेऊन गृहमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांची घोषणा ऐकून बाजूला असलेले पोलीस त्याच्या जवळ पोहोचले. त्यानंतर जवळच असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बनसोडे यांना नेण्यात आले. दलितांवरील अन्याय दूर झालेच पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशी घोषणाबाजी त्यांनी यावेळी केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

#politics #treding #solapursakal #marathinews #viral #sakalnews