¡Sorpréndeme!

विदर्भ व नागपुरातील गुरुवारच्या (ता. 25) महत्त्वाच्या घडामोडी

2021-04-28 380 Dailymotion

यवतमाळ : नेर तालुक्‍यातील पिंपरी (मुखत्यारपूर) गावात आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास पब्जी या गेमच्या आहारी गेल्यामुळे निखिल पुरुषोत्तम पिलेवान (वय 22) याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

चंद्रपूर : नागरी वस्तींवर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामागच्या कारणांचा कितीही उहापोह केला तरी या घटना कमी होण्याचे नाव नाही आणि या हल्ल्यांमध्ये गरीब शेतकऱ्यांचा नाहक बळी जातो, हे मान्य करावेच लागेल. गेल्या काही दिवसात वाघाने नागभीडवासीयांना त्रस्त केले होतेच, त्यातच आता रानडुकरानेही हल्ला केल्याची घटना घडली.

चंद्रपूर : वाळूतस्करीत आरोपी असलेला प्रदेश कॉंग्रेसचा सचिव सचिन कत्याल सध्या फरार आहे. मात्र, याकाळातही पक्षाशी त्याची नाळ घट्ट जुळून आहे. याच प्रेमापोटी कॉंग्रेसच्या नव्या जिल्हा आणि शहर अध्यक्षांना त्याने फेसबुकवरून भरभरून शुभेच्छा दिल्या.

यवतमाळ : नेर तालुक्‍यातील पिंपरी (मुखत्यारपूर) गावात आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास पब्जी या गेमच्या आहारी गेल्यामुळे निखिल पुरुषोत्तम पिलेवान (वय 22) याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha