नागपूर : शहरात अवैध पार्किंगची समस्या निर्माण झालेली आहे. चारचाकी असो किंवा दुचाकी नागरिकांना जिथे जागा मिळेल तिथे वाहन पार्किंग करतात. बर्डी, महाल, धंतोली, रामदासपेठ आदी ठिकाणी अर्धा रस्ताच वाहनांनी आपल्या कवेत घेतल्याचे पाहायला मिळते. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. (व्हिडिओ : संदीप सोनी)