राजुरा (जि.चंद्रपूर) : निसर्गाशी मैत्री, बालपणीचे खेळ, नात्यातील गोडवा जपायचं असेल तर अवश्य एकदा 'एक मोकळा श्वास' कृषी पर्यटन कृषी पर्यटन केंद्रास भेट दिली पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील सुहास आसेकर, रिंकू मरस्कोल्हे, रुपेश शिवणकर व नितीन मुसळे या सुशिक्षित ध्येयवेड्या चार तरुणांनी पंधरा एकर बंदर जागेवर कृषी पर्यटनाची संकल्पना साकारली आहे. राजुरा तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या चनाखा या गावी अविरत प्रयत्नातून साकारलेल्या या कृषी पर्यटन केंद्रास राष्ट्रीय पर्यटन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आहे. धकाधकीच्या जीवनात निसर्गाचा निवांत आनंद लुटण्यासाठी भेट द्यावे असे हे केंद्र आहे. (व्हिडिओ: आनंद चलाख-श्रीकृष्ण गोरे)