नागपूर : राज्य सरकारने 15 आणि 26 जूनपासून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. त्यात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण आणि इतर विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत दिशानिर्देश दिले आहे. मात्र, राज्यातील सर्वच भागातील समस्या वेगवेगळ्या असल्याने त्या जाणून घेत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यासह विदर्भातील शाळा सध्यातरी नकोच, असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी ऑनलाइन शिक्षण हा पूर्ण पर्याय नसल्याचे ते म्हणाले.
#Education #School #Opening #Viral #SakalNews #MarathiNews#ESakalNews