- नागपूर : रामेश्वरी चौकातील गुप्ता कॉम्पलेक्सचे मालक बिल्डर रविशंकर गुप्तासह भागीदाराला अजनी पोलिसांनी सुरेश कनोजीया जळीतकांडप्रकरणी अटक केली आहे. दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
- अमरावती : दररोज नव्या नव्या परिसरात कोरोनाबाधित आढळत असल्याने अमरावती शहरातील यंत्रणेची आता दमछाक होऊ लागली आहे. स्थानिक प्रभा कॉलनी येथील 23 वर्षीय युवकाचा कोरोना चाचणी अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. संबंधित युवक हा मध्यंतरी अकोला येथे असल्याचे समजते.
- गडचिरोली : विकासकामातून दुर्गम गावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला भ्रष्टाचाराचा सुरुंग लागला आहे. मंजूर झालेली कामे न करताच "त्या" कामांचे कोट्यवधी रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha