¡Sorpréndeme!

घरातच राहून व्यायाम करा: अभिनेता निवास मोरे

2021-04-28 14 Dailymotion

सावरखेड एक गाव, 6 सप्टेंबर, भरत आला परत, आदिशक्ती, वैभवलक्ष्मी, कावळा यासारख्या अनेक चित्रपटामध्ये अभिनेते निवास मोरे यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भरपूर वेळ मिळत असल्याने व्यायाम करून त्याचा सदुपयोग केला जात आहे. रसिकांनाही घरातच राहून व्यायाम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.