अकोला : कृषी उत्पन्न बाजार समिती बोरगाव मंजू येथे सीसीआय नोंदणी केंद्रावर केवळ दोन कर्मचाऱ्यांवर नोंदणी सुरु आहे. बाजार समितीत ना पोलिस कर्मचारी, ना शिस्त यामुळे केंद्रावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. एकीकडे उन्हाचा पारा चाळीशी पार केला आहे. त्यातच कोरोनाचीही भीती. अशातच शेकडो शेतकरी बांधव बोरगाव येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी एकत्र झाले. मात्र, अपूऱ्या कर्मचाऱ्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (व्हिडीओ : अमित गावंडे, सकाळ, अकोला )
#cotton #sakal #cci #farmer #viral #marathinews #viralvideo #akola #borgaon