अभिनेत्री पल्लवी पटवर्धन हे नाव चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले आहे. महागुरू, गुलदस्ता, सातवी पास, शिवशक्ती, धोंडी, सत्यमेव जयते, जुगाड, यंग्राड, चाबूक यासारखे अनेक चित्रपट, तसेच प्रेमाचा गेम सेम टू सेम यासारख्या विविध मालिकांमध्ये अभिनय केला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ती योगासने आणि प्राणायाम करून आरोग्याची काळजी घेत आहे. रसिकांनीही व्यायाम, योगासने करून स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन तिने केले आहे.