यारा, गोट्या, खलवली, माझं माहेर तुझं घर यासारख्या विविध मराठी चित्रपटामधून अभिनेत्री पल्लवी ओढेकर हिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. व्यावसायिक नाटके, एकांकिका यामध्येही अभिनय केला आहे. या लॉकडाऊनच्या काळात भरपूर वेळ मिळत असल्याने व्यायामावर लक्ष केंद्रीत केले. रसिक प्रेक्षकांनाही ती घरातच राहून व्यायामाचा सल्ला देत आहे.