¡Sorpréndeme!

तुमचे आवडते सेलिब्रिटी पण सांगताहेत stay home stay fit

2021-04-28 1,245 Dailymotion

नाशिक, ता. 18 : जगभर कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, दुकाने, शाळा, महाविद्यालय, कार्यालये बंद आहेत तसेच चित्रपट आणि विविध मालिकांचे चित्रीकरणही बंद आहे. या काळात मालिका चित्रपटात काम करणारे सेलिब्रिटीदेखील पूर्ण वेळ घरातच आहेत. "लक्ष्य" मालिकेतील चित्रा कुलकर्णी, "रंग माझा वेगळा" मालिकेतील प्रिया तुळजापूरकर, "रात्रीस खेळ चाले" मालिकेतील पूजा गोरे आणि "माझ्या नवऱ्याची बायको" मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिजित खांडकेकर हे सर्व सेलिब्रिटी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, म्हणून घरातच व्यायाम, प्राणायाम आणि योगासने करत आहेत. आणि रसिक प्रेक्षकांनाही घराबाहेर न पडता घरात राहूनच व्यायामाचा सल्ला देत आहे.
.
.
#nashik #localnews #celebrities #marathicelebs #news #localnews #maharashtra #marathinews #coronavirus #covid19 #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos