औरंगाबाद : इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाला अटकाव करण्यात लॉकडाऊन उपयोगी पडले आहे. पण आता हे सरसकट लॉकडाऊन कमी करता येईल का, याचा विचार व्हावा, असं मत ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे. रोगाबद्दल सावधगिरी असावी, पण त्याच्याबद्दल फोबिया डेव्हलप होऊ नये. आता हे लॉकडाऊन सरसकट असेच चालू राहिले, तर अर्थव्यवस्था मोडून पडेल. सार्वजनिक ठिकाणं, मनोरंजनाचे कार्यक्रम बंद असले, तरी लोकांचा किमान रोजगार सुरू होईल, असे उद्योग सुरू करावेत, असेही ते म्हणाले.
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Lockdown #sakal #viral #video #videos #viralvideo #viralvideos