औरंगाबाद : कोरोनाच्या लढाईत बँक कर्मचारीही सर्वस्व अर्पण करून काम करत आहे. याची दखल सरकारने घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांना आवश्यक संरक्षणही द्यायला हवे. बँकेत होणारी गर्दी लक्षात घेता सरकारने काळजी घेऊन प्रत्येक बँकेसमोर एक सुरक्षा गार्ड उभा करावा व त्या गार्डच्या माध्यमातून बँकेत पाच-पाच ग्राहक पाच सोडावेत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन चे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी केली आहे.