औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे संकट आले, पैठण तालुक्यातील दृश्य
दावरवाडी (औरंगाबाद) : एकिकडे कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून सर्वत्र जमावबंदी चालू असतांना बुधवारी (ता. 25) दुपारी दोन वाजेदरम्यान दोन ते पावणे तीनपर्यंत नांदर, कौदर, डेरा शिवारात जोरदार पाऊस पडला. तर दावरवाडी शिवारात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. शेतात सोंगणीसाठी काढुन ठेवलेल्या ज्वारी उन्हाळी बाजरी, गहू भिजून पिकांचे नुकसान झाले.
(व्हिडीओ : दिगंबर सोनवणे)