कोरोनाच्या दोन व्यक्तींना डिस्चार्ज-विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर
पुणे, दिनांक 25- जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या ज्या दोन व्यक्ती अॅडमिट झाल्या होत्या, त्यांच्या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत, त्यामुळे आज त्यांना डीस्चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे तीन पेशंट अॅडमिट झाले होते, त्यांच्या पहिल्या टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत, आज त्यांच्या दुस-या टेस्ट घेत आहोत, त्या निगेटीव्ह आल्या तर त्यांना उद्या डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतांनाच सर्वांच्या मदतीने कोरोनावर मात करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #Pune #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID