¡Sorpréndeme!

बीडमध्ये शिवजयंती निमित्त चित्तथरारक कसरती..!!

2021-04-28 565 Dailymotion

अशी जोरदार झाली साजरी बीडमध्ये शिवजयंती, चित्तथरारक कसरतींनी फेडले शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे

बीड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती बीडमध्ये उत्साहात साजरी झाली. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकाराने निघालेल्या सार्वजनिक उत्सव समितिच्या मिरवणुकीत पंजाब, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यातील कलाकारांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. तर, सातशे तरुण-तरुणींच्या ढोल पथकाने लक्ष वेधून घेतले. तुम्हीही पहा हा बीडच्या शिवजयंतीचा सोहळा.

(व्हिडिओ : दत्ता देशमुख)

#sakal #sakalnews #viralnews #viral #news #sakalmedia #shivjayanti #shivajimaharaj