''सुप्रिया सुळे यांना एक लाख मतांने पराभूत करू' या काकडेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता,''प्रत्येकाला आपले मत ठरवण्याचा अधिकार असतो. तसेच हे काकडे यांचे मत आहे.'' अशी प्रतिक्रिया देत काकडें यांचे वक्तव्य गांभीर्यांने घेत नसल्याचे स्पष्ट शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
''मी काचंनला कित्येक वर्षांपासून ओळखते. अतिशय चांगली आणि सुसंस्कृत मुलगी आहे.'' असे मत त्यांनी कांचन कुल यांच्याबाबत दिले.
'मी विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण करते. विकासाचे मुद्दे हेच माझे प्रचाराचे मुद्दे असतील'' असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील धायरी येथे प्रचार दरम्यान त्यांनी 'सकाळ' सोबत संवाद साधला.
(व्हिडिओ -विठ्ठल तांबे)