पाटण - पाणीसाठ्यात होणारी लक्षणीय वाढ विचारात घेऊन कोयना धरण व्यवस्थापनाने आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडून नदीपात्रात प्रतिसेकंद 9511 क्युसेक पाणी सोडण्यास सुरवात केली. त्यामुळे संगमनगर पूल पाण्याखाली गेला असून, पुलापलीकडील 35 गावांचा संपर्क तुटला आहे. कोयना धरणात 80.30 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.