मुंबई - एखाद्या चित्रपटाचा प्रिक्वल कितीही गाजला, तरी त्याचा सिक्वल नेहमीच फ्लॉप ठरतो, असा आजपर्यंतचा बॉलिवूडचा अनुभव आहे. पण, चित्रपटाचा प्रिक्वलच फ्लॉप ठरला तर काय?
मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला साहेब बिवी और गॅंगस्टर हा चित्रपट तिकीट बारीवर फारसा गल्ला जमवू शकला नाही. मात्र, चित्रपटाला परीक्षकांकडून मिळालेल्या वाहवाने दिग्दर्शक तिगमांशू धुलिया भलताच खुष झाला आणि आता तो या चित्रपटाचा रिटर्न बनविण्याची तयारी करतोय. मात्र, हा सिक्वल प्रिक्वलपेक्षा वेगळा असेल.
या चित्रपटाच्या कथेत तिगमांशू थोडा बदल करत असून पूर्वी मेल डॉमिनेटिंग असलेला हा चित्रपट आता फिमेल डॉमिनेटिंग असणार आहे.
कथेबरोबरच चित्रपटाच्या कलाकारांमध्येही बदल करणार असून आता जिमी शेरगील, रणदीप हड्डा आणि माही गीलसोबत इरफान खान, सोहा अली खान प्रमुख भूमिकेत असतील.