मुंबई -आजच्या शुक्रवारी तब्बल चार चित्रपट तिकीट बारीवर झळकले. त्यात एका मराठी चित्रपटाचा समावेश असल्याने सर्वांनाच या चित्रपटांच्या यशाविषयीची उत्सुकता लागली आहे.
तिगमांशू धुलिया दिग्दर्शित पान सिंग तोमर, आदित्या दत्त दिग्दर्शित वील यु मॅरी मी, अनू मेनन दिग्दर्शित लंडन पॅरिस न्यूयॉर्क हे तीन हिंदी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असून त्याला टक्कर देण्यासाठी सतीश मोतलिंग दिग्दर्शित मॅटर हा मराठी चित्रपट दिग्दर्शित झाला आहे. जितेंद्र जोशी, राजेश श्रुंगारपुरे, संतोष जुवेकर आणि सुशांत शेलार हे कलाकार चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. रिमांडहोममधून अंडरवर्ल्डपर्यंतचा प्रवास त्यात दाखविण्यात आला आहे. मराठीतील पहिला अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपट अशी या चित्रपटाची जाहीरात केली जात आहे.
तर, पानसिंग तोमर या चित्रपटात सैनिक त्यानंतर तो बनलेला ऍथलिट आणि अखेर तो दरोडेखोर कसा होतो, याचे चित्रण करण्यात आले आहे. इरफान खानने यात पान सिंहची भूमिका केली आहे.
वील यु मॅरी मी मध्ये एका तरुणीच्या मागे लागलेल्या तीन तरुणांची कथा दाखिविण्यात आली आहे.तर लंडन पॅरिस न्यूयॉर्कमध्ये प्रेमकथा रंगविण्यात आली आहे.