स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राला या रोगावरील लसीसाठी अजून बरीच वाट पाहावी लागणार आहे. लस बाजारात उपलब्ध झाली असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी ४ जूनला केली. मात्र, ही लस सामान्य रुग्णांपर्यंत पोचण्यासाठी अजून दोन महिने लागणार आहेत. विशेष म्हणजे, पावसाळी वातावरणात स्वाइन फ्लूचे विषाणू सर्वाधिक फैलावतात, याचा अनुभव असूनही ही लस लोकांच्या हाती सोपविण्यासाठी सरकारी पातळीवर अत्यंत संथ गतीने काम सुरू असल्याचे दिसत आहे.