कोल्हापूर - करवीर निवासिनी महालक्ष्मीची यंदाची नगरप्रदक्षिणा वैशिष्ट्यपुर्ण ठरणार आहे. कारण राजर्षी शाहूंनी महालक्ष्मीला अर्पण केलेला पारंपारिक रथ आता चांदीने मढवला जात आहे, आणि हाच रथ आता चांदीच्या झळाळीसह यंदाच्या रथोत्सवात असेल.