गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मासिक पाळीदरम्यान करोनाची लस न घेण्यासंदर्भात सल्ला देणारी एक पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये लसीकरणाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नेमका मासिक पाळी आणि लसीकरण यांचा काय संबंध आहे? यावर न्यूकॅसल विद्यापीठाचे व्याख्याते डॉ. तन्मय बागडे आणि मानसिक आरोग्य प्रथमोपचार अधिकारी डॉ. कांचन होनप यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
#COVIDVaccination #menstruation #sideeffects #COVID19 #explain